शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करा : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर :- ज्या ज्या वेळी देशासह महाराष्ट्रात कोणत्याही रूपात आपत्ती आली. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) ती निवारण्यासाठी धावून गेले आहेत. कोवीड या महामारीत ही शरद पवार जनतेला दिलासा देण्यासाठी आणि कोरोना योद्ध्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले आहेत. त्यामुळे पवार यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करा अशी मागणी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) त्यांनी केली.

मुश्रीफ म्हणाले, कोरोना (Corona) बाधितांचा आकडा कमी होत आहे तसेच बाधितांच्या मृत्यूची संख्या ही घटत चालली आहे. बदलणारी ही स्थिती निश्चितच दिलासादायक आहे परंतु धोका टळलेला नाही, असा दक्षतेचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आत्ता जरी परिस्थिती चांगली वाटत असली तरी लवकरच हॉटेल, लोकल आणि रेल्वे सेवा तसेच नवरात्रोत्सवाच्या सणामुळे रुग्ण वाढणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी गरजेची आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी येत्या जुलै पर्यंत २५ कोटी लोकांना कोरोना ची लस देणार असल्याची घोषणा केली.दरम्यान देशाची १४० कोटी लोकसंख्या असताना नेमके कोणाला..? कोणत्या वयोगटाला व कशी देणार..? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बैठकीला माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, मुरगुडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनिता पाटील, कोवीड केअर सेंटरचे डॉ अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याची परंपरा ; कृषी विधेयकावरुन शरद पवारांवर बोचरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER