अनिल देशमुखांच्या ठिकाणी संग्राम जगताप यांना मंत्री करा !

अहमदनगर : खंडणी वसूल करण्याच्या आरोपावरून अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे. त्या रिक्त पदावर आमदार संग्राम जगताप यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने एक ठराव संमत करून केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी हा ठराव मांडण्यात आला. या ठरावात आमदार संग्राम जगताप यांनी मंत्रिपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिनी एक ठराव मांडण्यात आला. त्यात संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जगताप म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना चार विधानसभा सदस्यांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा विधानसभा सदस्य असूनही प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. हा अहमदनगर जिल्ह्यावर झालेला राजकीय अन्याय आहे. त्यामुळे जगताप यांना मंत्रिपद देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button