आश्वासनानुसार आरक्षण द्या; सचिन पायलट यांनी गेहलोत यांना लिहिले पत्र

Sachin Pilot - Ashok Gehlot

जयपूर : राजस्थानमध्ये (Rajasthan) माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे बंड फसल्यानंतर गेले काही दिवस शांतता होती. आता पायलट यांनी सरकारी नोकरींमध्ये गुर्जर व अतिमागास वर्गाला आरक्षण द्या, अशी मागणी करून मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना कोंडीत पकडण्याचा फास टाकला आहे. हा विषय वाढला तर पुन्हा राज्यात राजकारण तापण्याची लक्षणं दिसत आहे.

पायलट यांनी याबाबत गेहलोत यांना पत्र लिहून आठवण करून दिली आहे की, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) अतिमागास वर्गाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे पालन होत नाही. या वर्गाच्या प्रतिनिधिमंडळांकडून असे कळले आहे की, २०१८ ला झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि इतर भरतीत अतिमागासांना आरक्षण मिळाले नाही. काल शनिवारी प्रसारमाध्यमांनी पायलट यांचे पत्र सार्वजनिक केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER