राहुल गांधींना तत्काळ राष्ट्रीय अध्यक्ष करा, दिल्ली काँग्रेसने केला ठराव

Rahul Gandhi

दिल्ली : पक्षाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय अध्यक्षपदी तत्काळ निवड करा, असा ठराव दिल्ली काँग्रेसने रविवारी मंजूर केला. दरम्यान, जून २०२१ पर्यंत राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल, असे काँग्रेसने नुकतेच जाहीर केले होते, हे उल्लेखनीय.

पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा हा मुद्दा अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये चर्चेत आहे. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्याला काँग्रेस कार्यकारिणीने मंजुरी दिली आहे. कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिले होते. यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर हुडा, पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, मनिष तिवारी आणि मुकुल वासनिक यांचा यामध्ये समावेश होता. सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यांत या पत्र लिहिणाऱ्या काही नेत्यांची बैठक घेऊन त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत चर्चा केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER