देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा; रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद

ramdas Athwale - uddhav thackeray - devendra fadnavis - Maharashtra Today

मुंबई : मराठा आरक्षणासह राज्यातील इतर महत्वाच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीत गेले होते. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. राज्यातील विषयांवर या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक खासगी बैठकही झाली . यापार्श्वभूमीवर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोदी-ठाकरे भेटीवर मोठं विधान केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पॅव्हेलियन यावं. भाजपसोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करावे , अशी सादच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे. शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान आठवले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली . यावेळी रिपाइं नेते अविनाश महातेकरही त्यांच्यासोबत होते. ही अनौपचारिक भेट होती. या भेटीत मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावर चर्चा झाली. तसेच देशभरातील क्षत्रियांनाही आरक्षण मिळावं याबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button