औरंगाबादमध्ये पुढचा महापौर काँग्रेसचाच, थोरातांचे शिवसेनेला थेट आव्हान

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat

औरंगाबाद :- औरंगाबाद (Aurangabad), कोल्हापूर (Kolhapur) या महापालिकांनी निवडणूक जवळ आली आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून, काँग्रेसने या दोन्ही महापालिकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी काँग्रेसचे (Congress) नेते व मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची भेट घेऊन स्वबळावर लढण्याची मागणी केली होती.

गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देत महापौर काँग्रेसचाच बनवण्याचा निश्चय करत थेट शिवसेनेलाच आव्हान दिल्याचा चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीच सत्ता औरंगाबादमध्ये आहे. महापौरपद देखील शिवसेनेकडे आहे. मात्र, आता थोरातांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ठिणगी पडू शकते.

‘औरंगाबादचा पुढचा महापौर काँग्रेसचा बसवण्यासाठी कामाला लागा’ असे आदेश बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिले. पक्षातील मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करा. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. ’महाविकास आघाडी म्हणून पहिले ध्येय हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हे आहे. निवडणुकीत आघाडीबाबत योग्य त्यावेळी निर्णय होईल. पण तुमची मते विचारात घेतली जातील. असे असले तरी सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा आणि औरंगाबादला पुन्हा एकदा काँग्रेसचा गड बनवा. ‘ असं देखील यावेळी थोरात म्हणाले.

ही बातमी पण वाचा : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याला काँग्रेसचा ठाम विरोध – बाळासाहेब थोरात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER