‘विकेल ते पिकेल’साठी आराखडा तयार करा – उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

अकोला : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या संशोधनाकडे जागरूकतेने लक्ष देण्याची गरज आहे. ‘विकेल ते पिकेल’ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा संशोधन आराखडा राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी एकत्र बसून शासनास सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले.

आज (मंगळवारी) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती २०२०’ची ४८ वी सभा अकोला येथे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणालेत, आपण शेतकऱ्यांना विविध योजनांमधून मदत करतो, अनुदाने देतो. पिकांसाठी हमीभावदेखील देतो. पण हमखास भाव मिळावा, यासाठी शासन आग्रही आहे. त्यादृष्टीने बाजारपेठ संशोधनाकडे अधिक जागरुकतेने लक्ष देण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी ‘विकेल ते पिकेल’ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या दिशेने वाटचाल करणारा एक निश्चित संशोधन आराखडा राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी एकत्र बसून शासनास सादर करावा.

ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा प्रतिकुलपती कृषी विद्यापीठे दादाजी भुसे होते. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे उपस्थित होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम व फलोत्पादन, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक विश्वजीत माने तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु डॉ. ए. एस. ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. एस. डी. सावंत कार्यक्रमात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER