मंत्री करा, जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या आमदाराने सुप्रिया सुळे यांच्याकडे केली मागणी !

Vikram Kale - Supriya Sule

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी जाहीर कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे मंत्रिपद देण्याची मागणी केली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात काळेंनी ही मागणी केली.

विक्रम काळे म्हणालेत, सतीश चव्हाण किंवा मला मंत्रि करा. दोघांना मंत्रिपद देण्यात अडचण असेल तर सीनिअर म्हणून सतीश चव्हाणांना संधी द्या.

अडीच वर्षांचा फॉर्म्युला

विक्रम काळेंनी मंत्रिपदाबाबत फॉर्म्युला सांगितलं. दोघांना मंत्रिपद द्यायचं असेल तर अडीच वर्षे सतीश चव्हाण यांना आणि अडिच वर्ष मला संधी द्या. विक्रम काळे शिक्षक मतदारसंघातून निवडून आल्यामुळे त्यांनी शिक्षण खाते देण्यात यावे सेही सुचवले.

भाजपाचा (BJP) दाखला

भाजपाने पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद दिले होते. त्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनेही पदवीधर आणि शिक्षक आमदारांना मंत्रिपद द्यावं, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER