खास नातेवाईकांसाठी बनवा’ ‘बाॅम्बे हलवा’ मिठाई..

Bombay Halwa

आपण जेव्हा मित्र परिवारांकडे जातो किंवा नातेवाईकांकडे जातो तेव्हा त्यांच्यासाठी बाजारातून मिठाई विकत घेऊन जातो. परंतु जर हीच मिठाई तुम्ही स्वतः बनविली आणि त्यांना दिली तर त्यांना किती आवडेल ना…तर म्हणून अशीच एक मिठाई आज आपण बनविणार आहोत. या मिठाईचा नाव आहे ‘बाॅम्बे हलवा’.

साहित्य :-

  •  १ बाउल पाणी
  •  १ बाउल साखर
  •  २ टी-स्पून लिम्बाचं रस
  •  १/२ टी-स्पून लाल कलर
  •  ४ टे-स्पून तूप
  •  वेलची पावडर

कार्न फ्लावर बनविण्यासाठी 

  •  १ बाउल कार्न फ्लावर
  •  १ बाउल पाणी

कृती :- सर्वात आधी एका नाॅन स्टिक भांड्याला गरम करायला ठेवावे. त्यात १ बाउल पाणी घ्यावे. नंतर साखर टाकावी. साखर विरघळे पर्यंत तसचं ठेवावे. दुसरीकडे १ बाउल पाणी घ्यावे, त्यात काॅर्न फ्लावर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आता विरघळलेल्या साखर सिरप मध्ये लिम्बाच रस टाकावे व नंतर काॅर्न फ्लावरची तयार केलेली पेस्ट टाकून सतत फिरवत राहावे. हे करतांना गॅस फ्लेम कमी करावे, जेणे करून काॅर्न फ्लावर करपणार नाही. थोड घट्ट झालं की थोडं थोडं तूप घालून ढवळत राहावे. नंतर यात कलर, वेलची पावडर घालून परत ढवळून घ्यावे. आता ड्राय फ्रुट्स घालून परत छान मिक्स करून घ्यावे. घट्ट झाले की गॅस फ्लेम बंद करावे. आता एका भांड्याला तूप लावून छान घट्ट झालेला हलवा त्यात टाकावे. ३-४ तास सेट करायला ठेवावे. आता याचे चौकन काप करावे. तुमचा कलरफुल ‘बाॅम्बे हलवा’ तयार.

ही बातमी पण वाचा : बनवा हिरवट पोपटी रंगाचे दुधीचे लाडू