वीज पुरवठा खंडित, मुंबईसह उपनगरात सर्वकाही थांबलं

Major Power Failure Across Mumbai

मुंबई : मुंबईसह (Mumbai) आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रीड फेल झाल्यानं बत्ती गुल झाल्याची माहिती मिळत आहे.मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली आहे. मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झालं. त्या सरकारी आणि खासगी कार्यालयातील काम ठप्प झालं. तर इंटरनेट ठप्प झाल्यामुळे मोबाईलमधून मेसेजही जात नव्हते. सोशल मीडियाही अचानक ठप्प झाल्याने मुंबईकर थोडावेळ गोंधळून गेले होते.

मुंबईत कोणकोणत्या भागात वीज गायब?

 • दादर
 • लालबाग
 • परळ
 • प्रभादेवी
 • वडाळा
 • ठाणे
 • नवी मुंबई
 • पनवेल
 • बोरिवली
 • मालाड
 • कांदिवली

दरम्यान, हा बिघाड नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी ग्रीड फेल्युअरमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सध्या वीज पुरवठा करणाऱ्या सगळ्या यंत्रणा या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER