उरणमधील ओएनजीसीच्या प्लांटमध्ये भीषण आग, ५ जणांचा मृत्यू

major-fire-breaks-out-at-ongc-uran-plant

रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहे. जेएनपीटी आणि ओएनजीसी फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

प्लांटच्या सीएफयू २ या भागाला भीषण आग लागली आहे. संपूर्ण परिसरात आगीमुळे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. लिक्विड लिकेजमुळे आग लागल्याची माहिती सध्या मिळत आहे. या आगीत सध्या घटनास्थळी ओएनजीसी आणि जेएनपीटी फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान आगीची भीषणता लक्षात घेता प्रशासनाकडून जवळपासच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. ओएनजीसी प्रकल्पापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : धुळे : केमिकल फॅक्टरीतील स्फोटप्रकरणी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा