तुर्की आणि ग्रीस भूकंपाने हादरले, इमारती पत्यासारख्या कोसळल्या

Turkey Earthquake

अंकारा :- जगभरात कोरोनाचं (Corona) संकट सुरु असताना तुर्की (Turkey) आणि ग्रीस (Greece) हे दोन देश आज (३० ऑक्टोबर) भूकंपाने (Earthquake) हादरले आहेत. तुर्की आणि ग्रीस किनारपट्टीच्या दरम्यान एजियन समुद्रात शुक्रवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता तब्बल ७.० रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात अनेक इमारती पत्यासारख्या जमिनीवर कोसळल्या आहेत (Major Earthquake in Turkey and Greece).

भूकंपाने तुर्की देशात प्रचंड नुकसान झालं आहे. तुर्की देशाच्या इजमिर शहरात अनेक भागांमध्ये इमारती कोसळल्या आहेत. शेकडो लोकांचे घरे उद्ध्वस्त झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे.

तुर्कीचे आरोग्यमंत्री फहार्टिन कोका यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. इजमिरचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७० नागरिकांचा प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, अद्यापही शेकडो लोक इमारतींच्या मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ६.९ होती आणि त्याचे केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होते. त्याच वेळी अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता ७.० होती. भूकंपाचे केंद्रस्थान एजियन समुद्रात १६.५ किमी खाली होते. भूकंपाची तीव्रता ६.६ नोंदविली गेली आहे असं तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER