पवारांच्या निवासस्थानी मोठी घडामोड; संजय राऊतांना डावलून बैठकीत काँग्रेस नेत्याची एंट्री

Kamalnath - Sharad Pawar

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादीची (NCP) बैठक होत असून या बैठकीपूर्वी शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) शरद पवारांच्या भेटीला आले होते. मात्र शरद पवारांनी त्यांना पाच मिनिटांचा वेळ देऊन रवाना केले. राष्ट्रवादीच्या बैठकीत केवळ पक्षाचे नेतेच हजर राहतील, अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती होती. मात्र संजय राऊत पवारांच्या घराबाहेर पडताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवारांच्या घरी दाखल झाले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी पवारांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे कमलनाथ हे काँग्रेसच्या (Congress) सर्वेसर्वा सोनिया गांधींचा (Sonia Gandhi) महत्त्वपूर्ण निरोप घेऊन आल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व घाडामोडींवरून पवारांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही तरी शिजतेय अशी माहिती पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER