अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला, प्रादेशिक आणीबाणी घोषित

Major cyber attack on US

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये (US) कोलोनियल पाईपलाईन कंपनीवर सायबर हल्ला (cyber attack) झाल्यानंतर प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही अमेरिकेत इंधन वाहतूक करणारी मोठी पाईपलाईन आहे. या यंत्रणेवर रॅन्समवेअर सायबर हल्ला झाल्याने तातडीने आणीबाणी लागू करण्यात आली.

पैशांसाठी हल्ला

या कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज २५ लाख बॅरल तेल वाहतूक होते. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील राज्यांना या पाईपलाईन द्वारे ४५ टक्के इंधन पुरवठा होतो. हॅकर्सने शुक्रवारी सायबर हल्ला केला. त्यानंतर पाईपालईनमधून होणारी गॅस वाहतूक बंद आहे. प्राथिमक माहितीनुसार डार्कसाईडच्या हॅकर्सने रॅन्समवेअरद्वारे हा हल्ला केला. हॅकर्सनी कोलोनियल पाईपलाईन कंपनीच्या १०० जीबी डाटावर नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी काही कॉम्प्युटर लॉक केले असून काही डाटाही लॉक केला आहे. डाटा परत करण्यासाठी हॅकर्सनी पैशाची मागणी केली आहे.

कोलोनियल पाईपलाईनवर सायबर हल्ला झाल्यानंतर तेल पुरवठा जवळपास बंद आहे. इंधन तेलाची कमतरता जाणवू नये म्हणून अमेरिकेत प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. गॅसोलिन, डिझेल, जेट फ्यूल आणि पेट्रोलियम पदार्थांची रस्तेमार्गे वाहतूक करण्यास सुरू करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून इंधनाची कमतरता जाणवू नये यासाठी तातडीने आणीबाणी लागू करण्यात आली.


या राज्यांवर परिणाम

कोलोनियल पाईपलाईन वर झालेल्या साबरहल्ल्याचा परिणाम अल्बामा, अर्कन्सास, कोलंबिया, फ्लोरिडा, जॉर्जिया, केंच्युकी, मिसीसीपी, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिलविनिया, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि इतर काही राज्यांवर याचा परिणाम झाला आहे. कोलोनियल पाईपलाईन कंपनींने पर्यायी पाईपलाईन सुरू केली असली तरी मुख्य पाईपलाईनवर त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही.

असा झाला हल्ला

कोरोनामुळे कोलोनियल कंपनीचे कर्मचारी – अभियंते घरुन काम करत आहेत. हॅकर्सनी याचा फायदा घेत डेस्कटॉप शेअरिंगचा डाटा खरेदी करुन त्यानंतर त्याद्वारे सायबर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारपर्यंत कोलोनियल पाईपलाईनाची सेवा पूर्ववत झाली नाहीतर अमेरिकेवर याचा मोठा परिणाम जाणवू शकतो.

दर्म्य, सायबर हल्ल्याचा परिणाम जाणवू लागला असून अमेरिकेत गॅसचे दर वाढले आहेत. या हल्ल्यामुळे इंधन तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button