जळगावात ट्रकचा भीषण अपघात, 15 मजुरांचा जागीच मृत्यू

major-accident-in-jalgaon-maharashtra-15-labours-died-on-the-spot

जळगाव: जळगावच्या यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात 15 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू(15 Labour Die) झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यावल तालुक्यातील किनगाव नजीक हा अपघात घडला. रात्री एक वाजताच्या सुमारास यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे निघाला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांच्या वरती मजूर बसले होते. या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक उलटा झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER