बॉलिवुडमधील दिलफेक मजनू

Ranbir Kapoor - Salman Khan - Sanjay Dutt

बॉलिवुडमधील (Bollywood) कलाकार एकत्र काम करीत असल्याने त्यांच्यात मधुर संबंध निर्माण होतात. यापैकी काही जणांचे संबंध लग्नापर्यंत पोहोचतात तर काही जण एक सोडून लगेचच दुसऱ्याच्या प्रेमात पडतात. वास्तव जीवनात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अनेक अफेयर केली आहेत. या अशा दिलफेक मजनूंच्या अनेक कथा बॉलिवुडमध्ये चर्चेिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दिलफेक मजूनीची माहिती देणार आहोत.

प्रेम प्रकरणे करण्यात संजय दत्तचा (Sanjay Dutt) हात कोणी धरणार नाही. त्यामुळेच त्याचा या यादीत पहिला क्रमांक लागला आहे. राजकुमार हिरानीने संजय दत्तच्या जीवनावर बनवलेल्या सिनेमात संजय दत्त झालेला रणबीर कपूर त्याची 300 अफेयर असल्याचे सांगतो. संजय दत्तने वास्तव जीवनातही 3 लग्ने केली. केवळ लग्नेच नाही तर अनेक नायिकांशीही त्याचे अफेयर होते. यात टीना मुनीम आणि माधुर दीक्षितचे (Madhuri Dixit) नाव खूप वर आहे.

संजय दत्तनंतर सलमान खानचेच नाव घ्यावे लागेल, सलमानने (Salman Khan) संजय दत्तसारखे लग्न केले नाही पण त्याचे गेल्या 25-30 वर्षात अनेक नायिकांशी अफेयर झालेले आहे. आणि काही ना काही कारणाने त्याचे अफेयर लग्नापर्यंत जाऊ शकले नव्हते. आज पन्नाशी पार केल्यानंतर सलमान खानचे अफेयर सुरुच आहे. सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, क्लॉडिया, कॅटरीना कैफ, यूलिया वांटूर यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, स्नेहा उल्लालसह आणखी काही नायिकांसोबतही त्याचे अफेयर असल्याचे सांगितले जाते.

अक्षय कुमारने (Akshay Kumar) ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केले तरी बाहेर अफेयर करण्याचे त्याने बंद केले नव्हते. जेव्हापासून ट्विंकलने त्याला धमकी दिली तेव्हापासून अक्षय ताळ्यावर आला असून सध्या त्याचे कोणाही बरोबर अफेयर नाही. मात्र सुरुवातीला अक्षयचे रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, आयशा झुल्का, पूजा बत्रा, प्रियंका चोप्रासोबत अफेयर होते. रवीना आणि प्रियांकासोबतचे त्याचे अफेयर खूपच सीरीजस होते. पण ते पुढे जाऊ शकले नव्हते.

नव्या पिढीतील रणबीर कपूरही (Ranbir Kapoor) असाच दिलफेक मजनू आहे. सध्या रणबीर आणि आलियाच्या अफेयरची जोरदार चर्चा असून यावर्षी ते दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र रणबीरची अनेक अफेयर झालेली आहेत. दीपिका, कॅटरीना, नरगिस फाखरी या नायिकांबरोबर त्याचे अफेयर होते. दीपिकाबरोबरचे अफेयर खूपच सीरीयस होते आणि दोघे लग्न करणार असेही म्हटले जात होते. पण ते होऊ शकले नाही आणि दीपिका अजूनही ते विसरलेली नाही. त्यामुळे रणवीर सिंहसोबत लग्न झाले असले तरी ती रणबीरसोबतच्या प्रेम प्रकरणाचे किस्से अधे मधे सांगून रणबीरला दोष देत असते.

ऋतिक रोशन (Hritik Roshan) हा केवळ बॉलिवुडचाच नव्हे तर हॉलिवुडमध्येही (Hollywood) अत्यंत हँडसम नायक म्हणून ओळख निर्माण केलेला नायक आहे. ऋतिक रोशनने प्रेमिका सुझानसोबत लग्न केले. मात्र त्याच्या पुरुषी सौंदर्यावर अनेक नायिकाही भाळल्या होत्या. त्यामुळे करीना कपूर, कॅटरीना कैफ, बारबरा मोरी, कंगना रनौतसोबत त्याचे अफेयर झाले होते. कंगनाचे अफेयर मात्र त्याला खूपच भारी पडले आहे.

जुन्या काळातील दिलीप कुमार (Dilip Kumar), राजकपूर (Raj Kapoor), देव आनंद (Dev Anand), शम्मी कपूर (Shammi Kapoor), धर्मेंद्र (Dharmendra) यांचीही अनेक प्रेमप्रकरणे झाली होती. यात काही नायिकांचाही समावेश आहे. ज्यांनी अनेकांसोबत अफेयर केली होती. स्थानाअभावी या सगळ्या मजनूंच्या प्रेमकथांचा माहिती देणे शक्य होणार नाही. त्याबाबत नंतर कधी तरी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER