मेन्टेन्स व्हॅन रुळवरून घसरली : कोकण रेल्वे वाहतूक कोलमडली

Maintenance van

रत्नागिरी : कोकण रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ वावे गावानजीक रेल्वे रुळावर मेन्टेन्स व्हॅनच्या मागील दोन चाके आज सकाळी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. गाडीचे रुळ मार्गावर घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. हे दुरुस्ती वाहन खवटी खेडहून रत्नागिरीकडे जात होते.

जोडलेले रुळ थंडीमुळे ब्रेक होतात. हा प्रकार वेल्डफेल्युअरचा असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. रुळावरून गाडी घसरल्याने रुळाला तडे गेले आहेत. तातडीने काम सुरु आहे. घडल्या प्रकारामुळे तेजस एक्सप्रेस महाड जवळील वीर स्थानकात थांबवण्यात आली आहे. मांडवी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आणि अन्य गाड्या चिपळूण, रत्नागिरी या स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी देखील या स्थानकात अडकून पडले आहेत. मार्ग सुरु करण्यासाठी रेल्वेचे कामगार प्रयत्न करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER