‘सरकार टिकवणे एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही’, मुख्यमंत्री पहिल्यांदाच पवारांना बोलले

Sharad Pawar & Uddhav Thackeray

मुंबई : पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर शरद पवार(Sharad Pawar) यांनी जवळपास एक महिन्यानंतर काल अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे पवार यांनासांगितल्याची माहिती पुढे आली आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

मागच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी या सगळ्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचे म्हणत तिन्ही पक्षांची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना ध्यानात आणून दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button