दिल्लीकरांनो, शांतता आणि बंधुभाव राखा : पंतप्रधान मोदी

PM Modi on new delhi violence

नवी दिल्ली :- दिल्लीकरांनो, शांतता आणि बंधुभाव राखा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीवासीयांना केले आहे.

दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर, आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटद्वारे हे आवाहन केले आहे.

शांतता आणि सौहार्दभाव हा आमचा गाभा आहे. दिल्लीतील सर्व बंधू-भगिनींनी शांतता आणि बंधुभाव राखावा, असे मी त्यांना आवाहन करीत आहे. दिल्लीतील जनजीवन लवकरात लवकर सुरळीत होण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो जखमी झाले आहेत.

दिल्लीतील वादळ शमवण्यासाठी मोदी-शाहांचा खास मोहरा डोवाल मैदानात


Web Title : Maintain peace and brotherhood : PM Modi

(Maharashtra Today : Online Marathi News Portal)