२९ तारखेला यूपीमधील सिनेमा हॉलमध्ये रिलीज होणार ‘मैं मुलायम सिंह यादव’, ओटीटीवर देखील आणण्याची तयारी

mai Mulayam Singh Yadav

समाजवादी पक्षाचे मार्गदर्शक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या जीवनावरील चित्रपट ‘मैं मुलायमसिंह यादव’ यूपीच्या सिनेमागृहात २९ जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्या मीना सेठी मंडलने शुक्रवारी सांगितले की, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नंतर रिलीज करण्याचा विचार आहे.

कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या लिफ्ट इंडिया अवॉर्डमध्ये चित्रपटाला बेस्ट बायोपिकसह अनेक श्रेणींमध्ये आठ पुरस्कार मिळाले आहेत, असा मंडलचा दावा आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट डेब्यू आर्टिस्ट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट निर्माता, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक, बेस्ट मेकअप आर्टिस्ट, बेस्ट बायोपिक आणि बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनचा पुरस्कार जिंकला आहे.

मीना म्हणाली की लवकरच या चित्रपटाचा खास कार्यक्रम मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानीही दाखविला जाईल. याद्वारे सपा चे मार्गदर्शक हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील. सपा च्या कार्यकर्त्यांसाठी त्याचा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अमित सेठी म्हणाला की, मुलायमसिंह यादव यांचे हावभाव, त्यांची चालण्याची शैली, त्यांची बोलण्याची शैली कॉपी करणे सोपे नव्हते. हे समजून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. मुलायम सिंह शी संबंधित सर्व व्हिडिओ पहावे लागले.

मुलायमशिवाय या चित्रपटामध्ये त्यांचा भाऊ शिवपाल यादव यांचे ठाम व्यक्तिरेखे आहेत. शिवपाल यांची भूमिका मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती साकारत आहे. प्रकाश बलबेटो यांनी राम मनोहर लोहिया, आणि गोविंद नामदेव यांनी चौधरी चरण सिंह यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री जरीना वहाब मुलायमची आई आणि अनुपम श्याम वडिलांच्या भूमिकेत आहे. तोशी आणि शारीब यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे आणि सलीम शेख यांनी गाण्याचे बोल लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER