‘राजगृहा’ची तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह निवासस्थानात ८ जुलै रोजी फुलझाडांची, कुंड्यांची नासधूस करण्यात आली होती. यावेळी आरोपीकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचे नुकसान झाले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून हल्लेखोरांनी पळ काढला होता. आता या तोडफोडप्रकरणी मुख्य आरोपीला (Main accused) अटक (Arrested) करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशाल मोरे ऊर्फ विठ्ठल काण्या (२०) असे या आरोपीचे नाव असून तो कल्याण येथे राहणारा आहे. याआधी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक करण्यात आली आहे.

दादर येथील ‘राजगृह’ (Rajgriha) या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आधी उमेश सीताराम जाधव (३५) या आरोपीला अटक केली होती. तो दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे स्पष्टपणे दिसत होते. त्या आधारे शोध घेऊन उमेश याला अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आता मुख्य आरोपीला अटक झाल्याने या हल्ल्यामागचे नेमके कारण उघड होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER