‘मैदान’ आता पुढील वर्षीच्या दसऱ्याला प्रदर्शित होणार

Maidaan

अभिनेता अजय देवगनने (Ajay Devgan) त्याच्या बहुचर्चित मैदान सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता आणखी पुढे ढकलली आहे. अजयचा मैदान आता पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात प्रदर्शित होण्याऐवजी दसऱ्याला प्रदर्शित केला जाणार आहे. स्वतः अजयनेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

‘मैदान’ (Maidaan) हा अजय देवगनच्या आगामी सिनेमांपैकी एक अत्यंत महत्वाचा असा सिनेमा आहे. या सिनेमाची निर्मिती बोनी कपूर करीत असून याचे दिग्दर्शन अमित शर्मा करीत आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा असून यात अजय देवगण फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारीत आहे. या सिनेमाचे शूटिंग गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरु करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची लाट येईपर्यंत शूटिंग सुरु होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि या सिनेमाचे शूटिंग बंद पडले. या सिनेमात अजय देवगणसोबत गजराज राव आणि प्रियमणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. खरे तर प्रियमणीच्या जागी निर्मात्यांनी साऊथची हिट अभिनेत्री कीर्ति सुरेशबरोबर बोलणी सुरु केली होती. परंतु आईच्या भूमिकेसाठी ती खूपच तरुण वाटेल म्हणून तिच्याऐवजी प्रियमणीला घेण्यात आले आहे. प्रियमणीने तिचे शूटिंग पूर्ण केले असून सिनेमाचे जवळ जवळ 65 टक्के शूटिंग पूर्ण झालेले आहे. आता जानेवारीपासून शूटिंग सुरु होऊन ते एप्रिमध्ये संपेल.

लॉकडाऊन उठल्यानंतर अजयने त्याच्या ‘भुज- द प्राईड ऑफ इंडिया’चे शूटिंग अगोदर पूर्ण केले आणि आता तो त्याची निर्मिती असलेल्या ‘मे डे’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. ‘मैदान’बाबतची माहिती देताना अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले आहे, ‘माझा ‘मैदान’ हा सिनेमा आता 2021 ला दसऱ्याच्या मुहुर्तावर जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाईल. याचे शूटिंग आम्ही जानेवारी 2021 पासून सुरु करणार आहोत. त्यामुळे हा सिनेमा आता पूर्वी जाहीर केलेल्या 13 ऑगस्ट 2021 ऐवजी दसऱ्याच्या मुहुर्तावर 15 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित करणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER