महिमा चौधरीच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

mahima Chaudary daughter - Maharastra Today
mahima Chaudary daughter - Maharastra Today

पूर्वीच्या काळी कलाकार त्यांच्या मुला-मुलींना लवकर मीडियासमोर येऊ देत नसत. एखाद्या कलाकाराला त्याच्या मुलाला नायक म्हणून पडद्यावर आणायचे असे त्यामुळे तो त्याचा चेहरा प्रेक्षकांसमोर येऊ देत नसे. आता जसे प्रेग्नन्सीपासूनचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले जातात तसे पूर्वी बिलकुल केले जात नसे. एखादा नायक बाप किंवा एखादी नायिका आई होणार आहे हे लोकांना कळतच नसे. आता मात्र तसे नाही. आता तर प्रेग्नन्सी, जन्म ते त्याच्या पहिल्या दुसऱ्या वाढदिवसापासूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि मीडियाही या नव्या युगातील स्टार किडसच्या मागे धावत असतो. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. आज याची आठवण येण्याची कारण म्हणजे प्रख्यात अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) आणि तिची मुलगी.

सुभाष घई यांच्या ‘परदेस’मधून महिमा चौधरीने बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले आणि एका रात्रीतच ती आघाडीची नायिका झाली होती. महिमाला एका जाहिरातीत पाहिल्यानंतर सुभाष घई यांनी तिला शाहरुखची नायिका बनण्याची संधी दिली होती. काही सिनेमे केल्यानंतर तिचा एक अॅक्सीडेट झाला आणि ती बॉलिवूडबाहेर फेकली गेली. आताही ती बॉलिवूडच्या संपर्कात नाही. मात्र अधे मध्ये सोशल मीडियावर ती सक्रिय असते. महिमा चौधरीला मुलगी असल्याचे अनेकांना माहित नव्हते ते आता योगायोगाने माहित झाले आहे. महिमा चौधरीचे करिअर तर फ्लॉप झालेच वैयक्तिक आयुष्यातही तिला यश मिळाले नाही. काही प्रेमप्रकरणानंतर २००६ मध्ये तिने आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने लगेचच मुलीला जन्म दिला. ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याने तिने लग्न केल्याचे तेव्हा बोलले जात होते. मात्र ६ वर्षातच म्हणजे २०१३ ला बॉबी आणि महिमा यांनी घटस्फोट घेतला. मुलगी मात्र महिमाकडेच राहिली आणि सिंगल मदर बनून ती मुलीचा सांभाळ करू लागली.

या दोघींचा फोटो योगायोगानेच समोर आला. त्याचे असे झाले की, महिमा चौधरी तिच्या मुलीसोबत अरियानासोबत (Ariana Mukherji) एका डेंटिस्टच्या दवाखान्यासमोर दिसली. एका फोटोग्राफरने त्यांचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. महिमाची मुलगी अरियाना आईसारखीच सुंदर असून तिचे फोटो पाहून तिच्या सौंदर्याची चर्चा होऊ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button