महिलांना सन्मान देण्यासाठी मुलांवर करा असे संस्कार…

संस्कार

आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा देत समोर जात आहे. परंतु आताही काही लोक आहेत जे स्त्रीला चूल आणि मुल पर्यंतच मर्यादित ठेवतात. काही जणांसाठी तर स्त्रीला ही एक वस्तूच असते. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण वाढतच आहे. आपली पुढची पीढी वाईट मार्गावर जावू नये, म्हणून त्यांना काही शिकवणी देणे गरजेचे आहे. आपण मुलींवर जसे संस्कार करतो किंवा त्यांना जसं वळण लावतो तसेच महिलांचा सन्मान करण्यासाठी मुलांवरही संस्कार करणे, त्यांना योग्य ती शिकवण देणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी…

  • घरातली कामे फक्त मुलींनीच करावी, असा दंडक नसावा.

  • मुलांसमोर आपली पत्नी किंवा इतर महिलांची खिल्ली उडवू नका. त्यांचा अपमान करु नका.

  • महिला विमान चालवू शकतात तर गाडी का नाही? त्यामुळे त्यांच्या ड्रायव्हिंगचे किस्से करू नका.

  • आपली पत्नी तसेच इतर महिलांचा सन्मान करा. महिलांचा सन्मान करण्याचे महत्त्व स्वतः जाणा आणि आपल्या मुलांनाही पटवून द्या.

  • बायकांना व्यवहारातले काही कळत नाही आणि त्यांना टेक्निकल गोष्टी समजत नाही, असे बोलून त्यांना हिणवू नका.

  • बायकांना हे काम जमणार नाही, हे त्या करू शकणार नाही, असेही चुकूनही बोलू नका. कारण यातून तुमच्या मुलांना स्त्री-पुरूष समानतेचा नकळत संदेश मिेळेल.