महेश मांजरेकरचा केसरी 15 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Mahesh Manjrekar Kesari

गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या खेळांवर सिनेमे तयार होत आलेले आहेत. आजही तापसी पन्नू, रणवीर सिंह, शाहीद कपूर असे कलाकार खेळावर आधारित सिनेमात काम करीत आहेत. याच यादीत ‘केसरी’ सिनेमाचाही समावेश आहे. नव्याने तयार होणारे हिंदीतील सिनेमे फक्त मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत तर काही कलाकारांचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात आहेत. लहान शहरातील तरुण होतकरू कुस्तीपटूची प्रेरणादायक कथा असलेला महेश मांजरेकरचा ‘केसरी’ १५ जानेवारीला इरॉस नाऊ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.

देशातीळ सर्वात जुन्या ऐतिहासिक खेळाची कुस्तीची कथा या सिनेमात मांडण्यात आलेली आहे. कुस्ती, ‘केसरी’ असा उल्लेख आला की बलराम हे नाव डोळ्यासमोर येते. ज्यांनी हा सर्वोच्च किताब मिळवला होता आणि त्यांच्या कुस्तीगीर आजोबांना, ज्यांच्यावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अंतिम सामना आणि त्यानंतर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता, त्यांना समर्पित केला होता. प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकण्यासाठी मेहनत करणाऱ्या एका युवकाचा संघर्ष या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात महेशसोबत विराट मकादे, विक्रम गोखले, रूपा बोरगांवकर, मोहन जोशी, उमेश जगताप, नचिकेत पूर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

महेश मांजरेकरने या सिनेमाबाबत बोलताना सांगितले, “केसरी”मध्ये आपला हेतू साध्य करण्यासाठी कठोर मेहनत करणाऱ्या एका छोट्या गावातील तरुणाची प्रेरणादायक कथा मांडण्यात आलेली आहे. या तरुणाचे नाव बलराम असते आणि तो कुस्तीतील मोठी पदवी हिंदकेसरी होण्याचे स्वप्न पाहातो. तो हे स्वप्न का पाहातो आणि ते कसे पूर्ण करतो ते आम्ही यात दाखवले आहे. मी यात बलरामच्या वस्तादाची शिक्षकाची भूमिका साकारीत आहे. या चित्रपटाशी जोडले जाणे हे माझ्यासाठी खूपच आनंददायक होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER