महेश मांजरेकर एनएच स्टुडियोसोबत करणार ड्रिम प्रोजेक्ट

Mahesh Manjrekar will do a dream project with NH Studios

कोरोना लॉकडाऊन उठल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांनी कामाला सुरुवात केली आहे. निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकरनेही (Mahesh Manjrekar) नव्या मराठी प्रोजेक्टला सुरुवात केली आहे. महेशचा हा नवा मराठी सिनेमा त्याचा ड्रिम प्रोजेक्ट असून हा एक क्राईम थ्रिलर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘पिंक’, ‘शिवाय’, ‘बेगम जान’ अशा हिंदी सिनेमांची निर्मिती करणारा ‘एनएच स्टुडिओज’ (NH Studios) पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मितीत उतरत आहे. त्यांच्यासोबत 99 प्रॉडक्शन्स ही कंपनीही जोडली गेली आहे. 99 प्रॉडक्शन्सचे संचालक निर्माते विजय शिंदे यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्यासोबत “पोरगं मजेतंय” या सिनेमाची निर्मिती केली आहे.

महेशच्या या नव्या चित्रपटाचे मुंबईत नुकतेच शूटिंग सुरु झाले. २८ ऑक्टोबरला सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला होता. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाबाबत बोलताना महेशने सांगितले, “गेली कित्येक वर्षं मी या सिनेमाच्या कथेचा विचार करीत होतो. पण ती कथा प्रत्यक्षात उतरण्याचा योग येत नव्हता. दरम्यान मी एकदा विजयला भेटलो आणि त्याला ही कथा अगदी सहजच ऐकवली. कथा ऐकता क्षणी विजय खुश झाला आणि त्याने माझ्याकडे हा सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली. माझी कथा विजयने एन एच स्टुडिओजचे निर्माते नरेंद्रजी यांना ऐकवली आणि त्यांनीही या सिनेमाच्या निर्मितीसाठी लगेचच होकार कळवला. असेही त्याने सांगितले.

एनएच स्टुडिओजचे निर्माते श्रेयांस हिरावत यांनी सांगितले, 40 वर्ष हिंदीत चित्रपट निर्मिती केल्यानंतर आता आम्ही आमचा पहिला मराठी सिनेमा महेश मांजरेकरसोबत करीत आहोत. ही आमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER