महेश मांजरेकर यांच्यावर व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप, फिर्याद दाखल

Mahesh Manjrekar

अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर एका व्यक्तीला चापट मारणे आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की एका कारची धडक झाल्या बद्दल हाथापाई झाली. त्या व्यक्तीने त्यांच्याविरूद्ध पुण्याच्या यवत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही घटना १५ जानेवारीची आहे.

या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या कारला दुसर्‍या कारने धडक दिली. त्यानंतर महेश मांजरेकर गाडीवरून खाली उतरले आणि दुसर्‍या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीशी वाद झाला. त्यांच्यावर शिवीगाळ व चापट मारल्याचा आरोप आहे.

अंडरवर्ल्ड कडून मिळाली होती धमकी
मागील ऑगस्टमध्ये महेश मांजरेकर यांना फोनवर धमकावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्याकडे ३५ कोटी रुपयांची मागणी केली गेली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत दादर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. महेश मांजरेकर यांच्या मते, कॉलरने स्वत: ला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा माणूस असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER