‘महेश कोठे शिवसेनेत अस्वस्थ !’ अजित पवारांचे मोठे विधान

Ajit Pawar & mahesh Kothe

मुंबई :- सोलापूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगत शिवसेनेला (Shivsena) राम राम ठोकला. कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर महेश कोठे यांचा पक्षप्रवेश झालाच नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे. त्या पक्षप्रवेशात महेश कोठे यांचे समर्थक असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत मोठे विधान केले.

कोठे मागील सहा ते सात महिन्यांपासून शिवसेनेत अस्वस्थ आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा बोलून दाखवली असेल. मात्र महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष एकत्र असल्याने एकमेकांचे नेते फोडायचे नाही असे ठरले आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे कोठे यांना आम्ही पक्षात घेतलेले नाही. मात्र कोठे जर शिवसेनेत नाराज असतील तर शिवसेनेने त्यांची नाराजी दूर करावी, असे विधान अजित पवार यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय ;  अजित पवारांनी दिले आदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER