लवीना लोधवर महेश भट्टनी ठोकला एक कोटींचा दावा

Mahesh Bhatt - Luviena Lodh

अभिनेत्री लवीना लोध (Luviena Lodh) ने इन्स्टाग्रामवर एक व्हीडियो अपलोड करीत प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. लवीनाने म्हटले होते की, महेश भट्ट आणि त्यांचा भाऊ मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) बॉलिवूडमधील (Bollywood) सगळ्यात मोठे डॉन आहेत. त्यांनी अनेक कलाकारांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. एखाद्या कलाकाराशी महेश भट्टचे भांडण झाले की, महेश भट्ट दुसऱ्या निर्माता दिग्दर्शकांना फोन करून त्या कलाकाराला काम देऊ नये असे सांगत असल्याचा आरोपही लवीनाने केला होता. लवीनाच्या या आरोपांवर महेश भट्ट यांनी उत्तर देण्याचे ठरवले आहे.

महेश भट्ट यांनी मुंबई हाईकोर्टात (Bombay High Court) धाव घेऊन लवीनावर एक कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. तसेच लवीनाला त्यांच्यावर खोटे, अपमानास्पद आरोप लावण्यास मनाई करण्याचीही मागणी केली आहे. महेश भट्ट यांच्या या अर्जावर 16 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. विशेष फिल्म्सच्या वकिलांनी महेश भट्ट यांच्या वतीने इन्स्टाग्राम वर पोस्ट टाकली असून त्यात म्हटले आहे की, लवीना लोधने जो व्हीडियो प्रसारित करीत आरोप केले आहेत त्यांचे मी माझ्या अशिलाच्या वतीने खंडन करतो. हे आरोप खोटे असून माझ्या अशिलाची प्रतिमा खराब करणारे आहेत. आम्ही आता कायद्यानुसार तिच्यावर कारवाई करू,

लवीना ने तिचा माजी पती सुमीत सभरवालवरही गंभीर आरोप केले आहे. लवीनाने म्हटले आहे की, सुमीत फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्जचा व्यवसाय करतो. तो अमायरा दस्तूर, सपना पब्बी अशा अभिनेत्रींना ड्रग्ज पुरवतो. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रख्यात निर्माता दिग्दर्शकांना मुलींचे फोटोही पाठवतो. आणि याची पूर्ण माहिती महेश भट्ट यांना आहे असेही तिने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER