महेंद्र सिंह धोनी आता दिसणार ‘कॅप्टन ७’ च्या रुपात

Maharashtra Today

झारखंडसारख्या छोट्या राज्यातून भारतीय क्रिकेट टीमचा यशस्वी कॅप्टन झालेल्या महेंद्र सिंह धोनीने (M S Dhoni) अनेक विक्रम केलेले आहेत. धोनीची ही यशोगाथा मोठ्या पडद्यावर ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ नावाने आली होती. दिवंगत सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) या सिनेमात महेंद्र सिंह धोनीची भूमिका साकारली होती. धोनीच्या कारकिर्दीप्रमाणेच या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो आयपीएलमध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व करीत आहे. मात्र निवृत्तीनंतर त्याने बॉलिवूडमध्ये (Bollywood) निर्माता म्हणून पाऊल टाकण्याचे ठरवले होते आणि यासाठी एका कंपनीची स्थापनाही केली होती. त्याच्या या कंपनीचे संपूर्ण काम त्याची पत्नी साक्षी पाहात आहे. धोनीची ही कंपनी आता त्याच्यावरच आधारित एक अॅनिमेटेड डिटेक्टिव्ह सीरीज तयार करणार आहे. या सीरीजचे नाव ‘कॅप्टन ७’ असे ठेवण्यात आले आहे. धोनी ७ नंबरची जर्सी घालतो म्हणून या डिटेक्टिव्हला ‘कॅप्टन ७’ असे म्हटले जाणार आहे.

महेंद्र सिंह धोनी सिंह धोनी और त्याची पत्नी साक्षी (Sakshi) यांची धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्लॅक व्हाईट ऑरेंज ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या या प्रोजेक्टसाठी एकत्र आलेल्या आहेत. या सीरीजच्या पहिल्या सीझनचे प्री प्रॉडक्शनचे काम सुरु करण्यात आले असून याचा पहिला सीझन २०२२ मध्ये रिलीज केला जाणार आहे. याबाबत माहिती देताना महेंद्र सिंह धोनीने सांगितले, देशातील ही पहिली अॅनिमेटेड स्पाय सीरीज असणार आहे. याची कथा आणि कॉन्सेप्ट खूपच वेगळा आणि चांगला आहे. क्रिकेटपेक्षा एका वेगळ्या जगात मी या सीरीजच्या निमित्ताने जाणार आहे. साक्षीने ‘कॅप्टन ७’ बाबत बोलताना सांगितले, ‘आमच्यासमोर जेव्हा माहीवर (धोनीला लाडाने माही म्हणतात) अॅनिमेटेड सीरीजचा कॉन्सेप्ट आला तेव्हा आम्ही लगेचच यासाठी तयार झालो. ही सीरीज खूपच रोमांचक असेल असेही साक्षीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button