महेंद्रसिंह धोनी करतो सेंद्रिय शेती!

Dhoni - Organic Farming

रांची : माणूस श्रीमंत असो किंवा गरीब…आयुष्याच्या एका क्षणापर्यंत काम करायचं आणि त्यानंतर गावाला जाऊन शेती करायची हे अनेक भारतीयांचे स्वप्न असतं. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीही याला अपवाद नाही. सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या धोनीने रांचीत सेंद्रिय शेती सुरू केली आहे. कलिंगड आणि पपईची लागवड केली आहे. धोनीने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरुन याचा व्हीडीओ पोस्ट केला आहे.

मारिया शारापोव्हाची निवृत्ती

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. कालानुरूप धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत वन-डे आणि टी-२० क्रिकेटकडे लक्ष दिले. मात्र २०१९ च्या विश्वचषकानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची संधी दिली. त्यानंतर आतापर्यंत धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएलच्या आगामी हंगामात धोनी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळेल. नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल तो कधी निर्णय घेतो हे कळू शकेल.