मैदानावर पुन्हा दिसला धोनीचा राग, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंचांशी झाला वाद

मंगळवारी RR विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि पंचांमध्ये वाद झाला. मैदानातील पंचांनी आपला निर्णय बदलल्यानंतर धोनी निराश झाला. वास्तविक, राजस्थानच्या डावाच्या १८ व्या षटकात टॉम कुरेनला बाद दिले होते.

दीपक चहरच्या चेंडूवर यष्टीरक्षक धोनीला झेलबाद झाल्यानंतर मैदानातील पंच सी शमसुद्दीनने टॉम कुरेनला बाद दिले होते.

राजस्थानकडे रिव्हयू बाकी नव्हता आणि फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतू लागला. यानंतर लेग अंपायर विनीत कुलकर्णींशी बोलल्यानंतर शमसुद्दीन यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी तिस तिसऱ्या पंचांची मदत घेतली.

यानंतर, निराश झालेला धोनी पंचांशी बोलत होता. टेलिव्हिजन रीप्लेवरून असे दिसून आले की धोनीच्या ग्लोव्हजमध्ये जाण्यापूर्वी चेंडूने टप्पा खाल्ला होता. थर्ड अंपायरने ऑन फील्ड पंचांचा निर्णय बदलला, ज्यामुळे धोनी नाराज दिसत होता. टॉम कुरेनला परत बोलावण्यात आले. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

योगायोगाने, गेल्या वर्षी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीने कंबरच्या वर नो बॉल न दिल्यामुळे मैदानावरील पंच उल्हास गंधे यांच्याविरुद्ध आपला राग व्यक्त केला. या दरम्यान धोनीने मैदानात प्रवेश केला आणि पंचांशी वाद घातला आणि खेळाडूंच्या आचारसंहितेचा भंग केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER