महायुतीचे सरकार द्विदशक गाठणार, तर महाआघाडी सत्तेपासून वंचित राहणार

Government of Mahayuti

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. यानंतर आता मतदारराजा राज्याचा कारभार कोणाकडे देणार, राज्याचे कारभारी बदलणार की तेच राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज ग्रामीण भागानं भरभरून मतदान केलं, तर शहरी भागांमधील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

ही बातमी पण वाचा : ‘महायुती अबकी बार २२० के पार’, विविध एक्झिट पोलनुसार महायुतीला रेकॉर्ड ब्रेक बहुमत

याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी ३ पर्यंतचं मतदान गृहीत धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही महायुतीच विजयी होईल, अशी सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळू शकतात. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुढील पाच वर्षेदेखील विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला ५५ ते ८१ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

विभागनिहाय अंदाज-
मुंबई : (एकूण जागा ३६) महायुती – २९ ते ३३, महाआघाडी – ० ते ६, इतर- १ ते २
ठाणे-कोकण : (एकूण जागा ३९) महायुती- ३० ते ३४, महाआघाडी- ३ ते ७, इतर- १ ते ३
मराठवाडा : (एकूण जागा ४६) महायुती २५ ते २९, महाआघाडी- १२ ते १६, इतर- ० ते ७
उत्तर महाराष्ट्र : (एकूण जागा ३५) महायुती- २१ ते २५, महाआघाडी- ११ ते १५, इतर- ० ते १
विदर्भ : (एकूण जागा ६२) महायुती- ४७ ते ५१, महाआघाडी- ६ ते१०, इतर- २ ते ४
पश्चिम महाराष्ट्र : (एकूण जागा ७०) महायुती- ४० ते ४४, महाआघाडी- २३ ते २७, इतर- ० ते ३