महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना पहिल्या फेरीत १६९०६ मतांची आघाडी..

Satish Chavan

औरंगाबाद : प्रत्येकी ५६ हजार मतांच्या पाच फेऱ्यांमधून ही मतमोजणी पुर्ण केली जाणार आहे. पैकी पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) यात चांगली आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पहिल्या फेरीत केवळ १०९७३ मते मिळाली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यावेळी विक्रमी मतदान झाले. २०१४ मध्ये केवळ ३८ टक्के एवढेच मतदान झाले होते. या निवडणुकीत मात्र हे प्रमाण तब्बल ६४ टक्यांवर पोहचले होते. त्यामुळे वाढीव मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, की मग विरोधात याबद्दल उत्सूकता निर्माण झाली होती. परंतु पहिल्या फेरीतील सतीश चव्हाण यांची आघाडी पाहता मतांचा वाढलेला टक्का सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्यासाठी फायद्याचा ठरतांना दिसतो आहे.

प्रत्येकी ५६ हजार मतांच्या पाच फेऱ्यांमधून ही मतमोजणी पुर्ण केली जाणार आहे. पैकी पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडीने यात चांगली आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पहिल्या फेरीत केवळ १०९७३ मते मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER