पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

मुंबई : महाविकास आघाडी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक एकत्र लढवत आहे. आम्हाला विश्वास आहे सर्व उमेदवार निवडून येतील, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. राज्यभरात विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मुंबईतून उद्योगधंदे पळवण्याचे प्रयत्न आधीही झाले, त्याला कधीही यश आलं नाही. “आरक्षण राहिले बाजूला आणि राजकारण सुरु”

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं अशी मागणी आतापर्यंत सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी केली आहे. सर्व पक्षांनी हीच भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, याला आमचाही पाठिंबा आहे. ओबीसींचे आरक्षण शाबूत ठेवा, या मागणीसाठी समता परिषद प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देत आहे. मराठा मोर्चा काढतात त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी मोर्चा काढणार आहेत. पण असे नको व्हायला” असं मत भुजबळांनी व्यक्त केलं.

“आरक्षण राहिले बाजूला आणि राजकारण सुरु झाल्याचं दिसत आहे. पण दुसर्‍याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्यांना विनंती करण्याचा अधिकार आहे” अशी भूमिका भुजबळांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER