महाविकास आघाडीचा बंदला पाठिंबा, काळे झेंडे लावा, डीपी स्टेटस काळा ठेवा : ना. सतेज पाटील

Hasan Mushrif-Satej Patil

कोल्हापूर :- उदया मंगळवारच्या देशव्यापी बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) या तिन्ही पक्षांचा पाठिंबा आहे. शेतकरी कामगार आणि सर्वच घटकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन शांतता आणि संयम पाळत बंद यशस्वी करा, असे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, शेतकऱ्यासह सर्वानी घराबाहेर काळे झेंडे फडकावेत. रस्त्यावरील आंदोलनापेक्षा सोशल मीडियावरील कल पाहूनच केंद्र सरकार निर्णय घेत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे तरुणाईने उद्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्या मोबाईलचा डीपी आणि स्टेटस काळा ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करावा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कृषी कायद्याला पाठिंबा व्यक्त केल्याने भाजप शेतकरी विरोधात असल्याचे यातून स्पष्ट दिसते भाजपच्या नेत्यांनी हिंमत असेल तर पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर गळ्यात भाजपचा स्कार्फ अडकवून जाऊन कृषी कायद्याचे महत्त्व सांगावे, मग शेतकरी काय करतो बघा.

उद्याचा बंद कोल्हापुरात कडकडीत होणार असून कोणीही दुकाने खुली करू नयेत, सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून दिल्लीत बारा दिवस थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER