गिरीश महाजनांचा दरारा : ग्रामपंचायत सदस्यांना सोबत राखण्यासाठी मविआ घेते हनुमंताची मदत !

Girish Mahajan

जळगाव : भाजपाचे (BJP) संकटमोचक नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मतदारसंघात फोडाफोडी होण्याच्या भीतीने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) त्यांच्या पॅनलच्या सदस्यांना ‘सोडून जाणार नाही’ म्हणून हनुमंतासमोर पाणी सोडून शपथ घ्यायला लावत आहेत!

जामनेरमधील महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी ग्रामपंचायत सदस्यांना हनुमंताला पाणी सोडून आघाडीसोबत राहण्याची शपथ घ्यायला लावल्याचा  व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गिरीश महाजन यांचे मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य दुसऱ्या पॅनलमध्ये जाऊ नयेत, यासाठी हरतऱ्हेची खबरदारी घेतली जाते. कुठे सदस्यांना सहलीवर नेत आहेत तर कुठे रिसॉर्टमध्ये ठेवले जाते. मात्र, जामनेरमध्ये अनोखा प्रकार घडला.

आमिषाला बळी पडणार नाही, एकनिष्ठ राहीन

मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विजयी सदस्यांना महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी हनुमंतासमोर सोबत राहण्याची शपथ घ्यायला लावली. मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, मी एकनिष्ठ राहीन, अशी हनुमंताला पाणी सोडून शपथ घ्यायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सौजन्य:-Tv9

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER