महाविकास आघाडीला मिळतील ७० टक्के मते- जयंत पाटील

Jayant Patil

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार स्वच्छ आहे, कोणाचे उसाचे पैसे बुडविले नाहीत. कारखान्याचे खासगीकरण करून कोणाला फसवले नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ७० टक्के मतदान होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. ते माधवनगर येथील डेक्कन हॉलमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, जयश्री पाटील, विशाल पाटील, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, चंद्रकांतदादांनी ‘मी पुन्हा नाही’ म्हणत पुण्यात विधानसभेची निवडणूक लढवली. पराभव समोर होता म्हणून दादा गेले.

महाविकास आघाडीचे पुणे नव्हे, तर पाचही ठिकाणचे उमेदवार विजयी होणार आहेत. राज्यमंत्री कदम म्हणाले, महाविकास आघाडीने एकत्रित येऊन पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही उमेदवार केवळ १५ दिवसांचे खेळाडू आहेत. निवडणूक संपली की ते जातील. अरुण अण्णांनी चांगले काम केले.  त्यामुळे मतदार साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अरुण लाड म्हणाले, पदवीधर मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या लोकांनी पदवीधरांचे प्रश्न सोडविले नाहीत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते दोन नंबरचे मंत्री होते. मात्र, प्रश्न ‘जैसे थे’ राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER