महाविकास आघाडीने जे वचन दिले ते पूर्ण करणार : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray.jpg

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि शिवसेनेने (Shivsena) जी वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करून दाखवणार, असे वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे. निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही. अर्थात निवडणूक ही लढावी लागते. त्यासाठी आपण मेहनत घेतो. पण त्यापुढे जाऊन जेव्हा आपण जिंकून येता तेव्हा मधल्या पाच वर्षांच्या  कालावधीत असतो.

या पाच वर्षांत लोकांना जी वचनं दिली असतात त्यांची कामं करायची असतात, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली . पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली MMRDA मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वरळी-शिवडी कनेक्ट ब्रीज, कफ परेड प्रकल्पाविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला .आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक अडीच ते पाच वर्षांत विविध पातळीवर निवडणूक होत असते.

त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात ठेवून महापालिकेचं बजेट सादर होणार नाही. मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने बजेट सादर होईल, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. केंद्राच्या बजेटवर काही लोकांच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर बघितल्या. निवडणुका नाहीत त्या राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणुका लक्षात घेऊन काही राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिका मुख्यालय पर्यटकांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण मुख्यालयाची वास्तू बघितली. तेव्हा महापालिका मुख्यालयाच्या वास्तूवर सर्वांत वरच्या मजल्यावर ‘देशातील सर्वांत एक नंबरचे शहर’ असे लिहिले होते. तो दर्जा कायम राहील, असेच बीएमसीचे बजेट यईल. मला याबाबत खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER