मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

BMC-MVA

मुंबई :- आगामी महापालिका निवडणुकांवरही शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले. आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच (MVA) नेतृत्वात लढल्या जातील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली .

महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत खासदार राऊत यांनी केले. अनेकजण म्हटले होते की, 11 दिवसांत सरकार पडेल. गणपतीला सरकारचे विसर्जन होईल, पण आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे, आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील, असे म्हणत भाजपाला (BJP) इशारा दिला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र असेल, असे भाकीत राऊत यांनी केले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीचे राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER