दोन्ही राजेंना टक्कर देत राष्ट्रवादी काँग्रेस पालिका निवडणूक लढणार

- शशिकांत शिंदेंची माहिती

Shashikant shinde

मुंबई : सातारा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागत असल्याने सरकारला अडचणीत आणणे, लोकामध्ये संभ्रम निर्माण करणे, आरक्षणावरून समाजात दरी निर्माण करणे , एवढेच काम भाजपच्या नेत्याला राहिले आहे. कोणाला तरी पुढे करत महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर आरोप करण्याच्या डाव खेळात आहेत . मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)राज्य सरकार ठाम असून सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडत आहे . मात्र भाजपाकडून मराठा समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे , असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी परिषदेत केला .

दरम्यान, सातारा नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीया माध्यमातून लढविली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले . यापार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पालिका निवडणुकीत टक्कर देणार असल्याचे म्हटले आहे .

सातारा पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत.नगरपचायती व सर्व पालिका निवदणुकात महाविकास आधाडीपा फॉर्म्युला राबविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला तर तसाही निर्णय घेण्यात येईल.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही राजकारणविरहित ठेवण्याचा सर्वांचाय प्रयत्न आहे . आगामी निवडणुकीत असा प्रयत्न केला जाऊ शकतो .

जिल्हा बकेत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. मात्र, सहकारात राजकारण येऊ नये, अशी आमची कायमची भूमिका असल्याचे म्हंटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER