महाविकास आघाडीचे ठरले, पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकत्रच लढणार

Mahavikas Aghadi

मुंबई : येत्या १ डिसेंबर रोजी होणार्‍या विधानपरिषदेच्या ५ जागांची निवडणूक महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अखेर ठरले आहे. १ डिसेंबर रोजी राज्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत असून भाजपाकडून राज्यातील पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. मात्र, आघाडीच्या पक्षांकडून उमेदवार देणे बाकी आहे. त्यातच, या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप (BJP) नेते व सांगली (Sangli) जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (Sangram Singh Deshmukh) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे, पुण्यासह राज्यातील इतर पक्षांतही आघाडीचा उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे. त्यातच, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरणार असल्याचे बाळासाहेब थोरात सांगितले.

तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, असे राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही सांगितले आहे. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना थोरात यांनी याबाबत माहिती दिली. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. त्यावेळी, लोकमतशी बोलताना या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER