बीएमसीत महाविकास आघाडी एकत्र; शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, काँग्रेसचीही साथ?

BMC - Mahavikas Aghadi - Maharastra Today
BMC - Mahavikas Aghadi - Maharastra Today

मुंबई : मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. भाजपाला रोखण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दिग्गज नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून यंदा आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच रणांगणात उतरवण्याची योजना आखण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने अर्ज दाखल केले नाही. काँग्रेसकडून समिती निवडणुकांसाठी अर्ज दाखल झाले असले तरी काँग्रेस अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. काँग्रेसही शिवसेनेलाच पाठिंबा देणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. भाजपला रोखण्यासाठी आगामी काळात महापालिकेतही महाविकास आघाडीतले पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button