भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही?- संजय राऊत

Eknath Khadse- Sharad Pawar.jpg

मुंबई :- मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी (NCP) प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. विशेष म्हणजे खडसेंनी (Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्रिपद देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संमती दिली आहे. सध्या कृषिमंत्रिपद हे शिवसेनेच्या वाट्याला असून, सेनेचे दादा भुसे हे कृषिमंत्री आहेत.

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खात्यांची अदलाबदल करण्यात येण्याची शक्यता असून, शिवसेनेकडे असलेले कृषिमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जर असे झाले तर महाविकास आघाडीत शरद पवारांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध होईल. महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्रिपदाच्या सर्व जागा फुल्ल  झाल्या आहेत. खडसे यांना कृषिमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या हे खातं शिवसेनेकडे असून दादा भुसे हे कृषिमंत्री आहेत. त्या बदल्यात शिवसेनेला राष्ट्रवादीकडील गृहनिर्माणमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्याला तर त्यासाठी तयार केले जाणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पक्षाची पश्चिम महाराष्ट्रात चांगली ताकद आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे कॅबिनेट तर दत्तात्रेय भरणे हे राज्यमंत्री आहेत. खडसेंच्या रूपाने  उत्तर महाराष्ट्रात मंत्रिपद पक्षाला द्यावे लागणार आहे. इतर विभागांत पक्षाकडे एक-दोन मंत्रिपदे आहेत. त्यातील कोणाचा नंबर खडसेंसाठी लागण्याचीही शक्यता  नाकारता येत नाही. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या माध्यमात चर्चेत आहेत. ते मंत्रिपद सोडून केवळ प्रदेशाध्यक्षपदावर समाधान मानणार का, यावरही चर्चा होत आहे.

आव्हाड हे मंत्रिपद सोडून संघटनेसाठी आले तर मग इतर मंत्र्यांचे पद वाचू शकते, असे एका नेत्याने सांगितले. दरम्यान, घटस्थापनेच्या दिवशी (ता.१७)  मुंबईत खडसे यांच्यासमवेत चार ते पाच प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करतील. त्यानंतर जळगाव येथे इतर कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भुसावळ, सावदा, फैजपूर, यावल येथील  विद्यमान भाजप नगरसेवकांचा गटही त्यांच्यासोबत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांना काँग्रेसमध्ये परत घेण्यासाठी मी प्रयत्न केला ; विखेंच्या आत्मचरित्रातून गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER