वीजबिलावरून महाविकास आघाडीने घुमजाव केले, निवडणुकीत हा मुद्दा मांडणार – फडणवीस

Devendra Fadnavis - Mahavikas Aghadi
  • भाजप सरकारच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम, थकबाकी असेल तर गरिबांना सवलत दिल्यामुळे

मुंबई :- वीज बिलावरुन महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi) घुमजाव केले आहे. हा मुद्दा आम्ही निवडणुकीत मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. तसेच, या सरकारकडून शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळणार नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.

भाजप (BJP) सरकारच्या काळात 36 हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागानं उत्तम काम केल्याचा दावा केला आहे. आमच्या काळात थकबाकी असेल तर त्याचा अर्थ आम्ही गरीबांना सवलत दिली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला लगावला आहे.

राज्यातील शिवसेना (Shiv Sena) -काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडी सरकारला वीजबिलात (Electricity Bill ) सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी (23 नोव्हेंबर) भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना, त्यांच्या भगव्यात भेसळ – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER