आम्ही सर्वच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत : अजित पवार

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar

बारामती : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या विचारांनी महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे. विविध विषयांवर नेत्यांची मते वेगवेगळी असून शकतात; मात्र, आम्ही सगळे जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

माझ्यावर Phd करायला चंद्रकांत पाटलांना दहा वर्ष लागतील : शरद पवार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज रविवारी अजित पवार यांनी मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आघाडीच्या ऐक्याची ग्वाही दिली.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) यावरून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे सरकारमध्ये फूट पडेल, असे भाकीत काहींनी वर्तविले आहे. याबाबत विचारता अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी अभेद्य असून, सरकारमध्ये फूट पडणार नाही. एनआरसी आणि एनपीआरबाबत, जे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मांडले आहे, तीच भूमिका आम्हा सगळ्यांची आहे. महाविकास आघाडी एका विचाराने आणि राज्याच्या विकासासाठी एकत्र आली आहे, असेही ते म्हणाले.