‘महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी !’ संजय राऊतांचे चकित करणारे विधान

Mahavikas Aghadi - Sanjay Raut - Maharashtra Today

नवी दिल्ली :- उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेली  स्फोटकं प्रकरण, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरण आणि आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या लेटरबॉम्बवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यात आता शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चकित करणारे विधान केले आहे.

महाराष्ट्रात स्थापन केलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही शिवसेनेची राजकीय मजबुरी आहे आणि हे सर्व भाजपमुळे झाले आहे. तिन्ही पक्षांत मतभिन्नता आहे. पण शिवसेनेने हिंदुत्वाशी कुठलीही तडजोड केली नाही आणि हिंदुत्वाचा अजेंडा बदलला नाही. सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आणि कंगना राणावत (Kangana Ranaut) प्रकरणात भाजपला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर विश्वास नव्हता. पण आता त्यांनी लिहिलेल्या पत्रावरून भाजपने रान उठवलं आहे. या प्रकरणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना माहिती दिली होती. पण परमबीर सिंग यांनी त्यांना काय सांगितलं हे आपल्याला माहीत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी परमबीर सिंग यांच्या पत्रातील नमूद असलेल्या तारखांवरूनही शंका उपस्थित केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीत पत्रकार परिषद घेत असताना परमबीर सिंग यांचं पत्र उजेडात येतं. हे सर्व पूर्वनियोजित असल्याचा आरोप राऊतांनी केला. संजय राऊत यांनी यासंदर्भात दैनिक भास्करला मुलाखत दिली आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांची भूमिका हीच ‘ठाकरे’ सरकारची भूमिका – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER