
पुणे : महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) तीन पक्षांची वेगवेगळे लढण्याची भूमिका घेतली, हे केवळ नाटक असून एकत्र आले तर तिकीट वाटपावरुन भांडणं सुरु होतील, अशी त्यांना भीती आहे. म्हणून वेगळ लढण्याचा सूर आळवला जात आहे. हे न कळायला कोल्हापूरची (Kolhapur) जनता मूर्ख नाही, असा पलटवार भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. शनिवारी दुपारी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचे स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी पलटवार केला.
आ. पाटील म्हणाले, स्थानिक निवडणुकीत तिघे एकत्र राहू शकत नाहीत. प्रत्येकाचा झेंडा वेगळा अजेंडा वेगळा आहे. एकमेकांचे विचारही भिन्न आहेत. त्यामुळे एकत्र लढलो तर उमेदवारीवरुन भांडणं होणार आहेत. कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागतील ही भीती निवडणुकीपूर्वीच लागल्याने वेगळे वेगळे लढत आहेत. अजून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र भीतीपोटी आतापासून वातावरण तयार केले जात आहे. त्यांनी वेगळ लढो अथवा एकत्र आम्हाला काही फरक पडत नाही. याचा भाजपला फायदाच होणार आहे. केवळ कोल्हापूरच काय राज्यातील मुंबईसह सर्व महापालिका, पालिका, निवडणूक ताकदीने लढण्याची आमच्यातही धमक आहे. असा इशाराही त्यांनी दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला