
मुंबई : राजकारणात टाळी एका हाताने वाजत नाही. भाजपासोबत दुरावा निर्माण होण्याचे कारण आम्ही नाही. आम्ही गेल्या ३० वर्षांपासून एकत्र होतो. आता राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही. सध्या सरकार उत्तम आणि शांतिपूर्ण मार्गानं चाललं आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ही बातमी पण वाचा:- महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असलं तरीही सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडेच : संजय राऊत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या कोरोनाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत सरकारच्या आकडेवारीवर आक्षेप घेतला. त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईची स्थिती आता नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. “फडणवीसांनीही सोबत राहायला हवं. कोणीही राजकारण करू नये. पुढील सहा महिने आपल्याला राजकारण करायचं नाही. हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. तसेच, कोरोनाच्या परिस्थितीवरून राजकारण करू नये. विरोधी पक्षाचे नेते शॅडो कॅबिनेट चालवतात. ते सरकारवर अंकुश ठेवतात. आमचं काही चुकलं तर फडणवीसांनी तसं करायला हवं. आम्हाला सरकार चालवण्यात कोणतीही अडचण नाही.” असे संजय राऊत म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला