महाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार : मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच वर्षे नव्हे, २५ नव्हे तर ५० वर्षे राज्यात कायम राहणार असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून यासाठी मुख्यमंत्री ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यानपिढ्या कायम राहील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, माझ्याकडे जनतेचे आशीर्वाद आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे.

सावरकर, शेतकरी खाणार अधिवेशन

महाराष्ट्राचा खरा राजा खेड्यापाड्यातील जनता असून तो माझ्यासमोर बसला आहे. त्यामुळे माझा आजवरचा अनुभव पणाला लावून माझ्या गोरगरीब जनतेला समाधान देण्याचा मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री म्हणून आता माझी कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू होत आहे.  त्यामुळे तुमचे आशीर्वाद असेच कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.